Dog Food Alert |सावधान! तुमच्या लाडक्या कुत्र्याला चुकूनही देऊ नका 'हे' ५ पदार्थ

पुढारी वृत्तसेवा

आपण जे खातो ते सर्वच कुत्र्यांसाठी सुरक्षित नसते. काही सामान्य पदार्थ त्यांच्यासाठी जीवघेणे ठरू शकतात.

चॉकलेटमध्ये 'थियोब्रोमाइन'असते. कुत्रे हे पचवू शकत नाहीत, ज्यामुळे त्यांच्या हृदयाचे ठोके वाढू शकतात आणि फिट्स येऊ शकतात.

कांदा आणि लसणामध्‍ये 'एन-प्रोपिल डायसल्फाइड' घटक असतो. या दोन पदार्थांचा समावेश असलेले पदार्थ खाल्‍याने कुत्र्यांच्या रक्तातील लाल पेशी नष्ट होऊन त्यांना 'ॲनिमिया'चा धोका निर्माण होतो."

द्राक्षांमुळे कुत्र्यांच्या किडनी (मूत्रपिंड) निकामी होऊ शकतात. अगदी थोड्या प्रमाणात खाल्ल्यानेही त्यांना उलट्या आणि सुस्ती येऊ शकते.

कॅफीन कुत्र्यांच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेवर थेट परिणाम करते. यामुळे रक्ताभिसरण बिघडून शकते.

अनेक 'शुगर-फ्री' पदार्थांत 'झायलीटोल' असते. यामुळे कुत्र्यांच्या शरीरातील इन्सुलिन अचानक वाढते.

तुमच्या कुत्र्याने हे पदार्थ खाल्ले असतील, तर उलट्या होणे, जुलाब, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा थरथरणे अशी लक्षणे दिसू शकतात.

घरगुती उपाय करण्याऐवजी त्वरित तुमच्या जवळच्या पशुवैद्यकाशी संपर्क साधा.

येथे क्‍लिक करा.