पुढारी वृत्तसेवा
लोखंडी वस्तू कालांतराने गंजतात, मात्र, रेल्वेमार्गाच्या रूळांना गंज का चढत नाही ? याचा कधी विचार केला आहे का?
वारा, ऊन आणि पाण्याचा रेल्वे ट्रॅक्सना (Railway track) सामना करावा लागतो, तरीही ट्रॅकला गंज का लागत नाही, यामागचे नेमके कारण काय?
रेल्वे ट्रॅक तयार करण्यासाठी खास प्रकारचे स्टील वापरले जाते. पोलाद आणि मिश्र धातू मिसळून ट्रेनचे ट्रॅक तयार केले जातात
पोलाद आणि मिश्र धातू मिसळून मँगेनीज स्टील तयार करून रूळांसाठी वापरले जाते, यामुळे ऑक्सिडेशन होत नसल्याने अनेक वर्षे रूळांना गंजत लागत नाही
रेल्वे रुळ साध्या लोखंडाचे नसतात, तर उच्च दर्जाचे कार्बन, मँगनीज स्टील वापरले जाते. हे स्टील खूप मजबूत आणि टिकाऊ असते
रुळांच्या वरच्या भागावर सतत ट्रेनची चाके फिरत असतात, घर्षणामुळे (friction) रुळांची पृष्ठभाग पॉलिशसारखी स्वच्छ राहते, तयार होणारा गंज लगेच घासला जातो
रुळांच्या खाली खडी पसरलेली असते, ही खडी पाणी साचू देत नाही, पाण्याचा निचरा झाल्याने ओलावा कमी झाल्याने गंज चढण्याची प्रक्रिया कमी होते
रेल्वे विभागाकडून सतत तपासणी, ग्राइंडिंग, ऑइलिंग, लुब्रिकेशन ची कामे केली जातात, त्यामुळे गंजापासून रूळांचे संरक्षण होते
रुळांवर दिसणारा तपकिरी रंग म्हणजे हलका गंज संरक्षणाचे काम करतो, हा थर आतल्या धातूचे संरक्षण करतो, या सर्व कारणांमुळे ते दीर्घकाळ सुरक्षित आणि मजबूत राहतात