अविनाश सुतार
घरात कुत्रे पाळणे अनेकांना आवडते, काहींना विशिष्ठ प्रजातींची कुत्री आवडतात. त्यासाठी ते भरपूर खर्चही करतात.
परंतु, कुत्र्यांच्या सर्व प्रजाती लहान मुलांसह राहणाऱ्या कुटुंबांसाठी योग्य ठरत नाहीत. काही कुत्र्यांमध्ये रखवालदार वृत्ती असते, काहींमध्ये शिकारी प्रवृत्ती खूप तीव्र असते, तर काहींचा स्वभाव संवेदनशील असतो.
त्यामुळे ते मुलांच्या अनियमित वागणुकीला किंवा त्यांच्या खेळांना सहन करू शकत नाहीत.
मुलासाठी पाळीव कुत्रा घेण्याचा विचार करत असाल, तर खाली दिलेल्या प्रजाती मुलांसह कुटुंबांसाठी योग्य ठरत नाहीत
चिहुआहुआला रफ खेळ सहन होत नाही. मुलांकडून होणारी चुकून ढकलणे किंवा जोराचे मिठी मारणे यामुळे त्यांना दुखापत होऊ शकते. कधी कधी ते चावण्याचा प्रयत्नही करू शकतात.
डल्मेशियन स्वभावाने चंचल असतात. त्यांच्यात चिडचिडेपणा असतो. काही वेळा ते विध्वंसक वर्तन करू शकतात. त्यामुळे अनोळखी व्यक्तींसह घरात असलेल्या मुलांसाठी धोकादायक ठरू शकतात.
मुलांना ज्याप्रकारे रफ खेळ किंवा सतत मिठ्या मारायला आवडतात, त्याचा चाऊ चाऊ यांना राग येतो. ते चिडू शकतात किंवा चावण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यांचा स्वभाव स्वतंत्र आणि थोडा अलिप्त असतो
अकीता हे विश्वासू आणि अत्यंत प्रामाणिक स्वभावाचे कुत्रे असतात, नैसर्गिकरित्या तापट असतात, मुलांकडून होणारी छेड किंवा अचानक हालचाल त्यांना पसंत पडत नाही. त्यांना शांत वातावरण आवडते
वायमारानर बुद्धिमान, खेळाडू वृत्तीचे. त्यांना शिकारीसाठी पाळतात, त्यांना सतत शारीरिक कृतींची आवश्यकता असते. त्यामुळे ते बेचैन, चंचल किंवा चिंताग्रस्त होऊ शकतात. धावणाऱ्या मुलांच्या मागे लागण्याचा प्रयत्न करतात