कुत्र्याचे चावे पावसाळ्यात किंवा इतर ऋतूत वारंवार होत असतात. कधी कधी घरातील पाळीव कुत्राही चावू शकतो .कुत्रा चावल्यानंतर पहिले आणि सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे जखम स्वच्छ पाणी व साबणाने त्वरित धुणे .जखम किमान १० ते १५ मिनिटे वाहत्या पाण्याखाली धुवावी आणि कोणतेही घाणे कापड वापरू नये.जखमेवर घरगुती उपाय किंवा मलम लावू नका.जखमेवर हळद, माती, नीमाचा रस किंवा इतर घरगुती उपाय जखमेवर करू नयेत. डॉक्टरकडे जाण्यापूर्वी जखम स्वच्छ कापड किंवा पट्टी बांधावी.कुत्र्याच्या चाव्यानंतर तातडीने जवळच्या दवाखान्यात किंवा आरोग्य केंद्रात जाऊन अँटी-रेबीज लस (ARV) घेणे .कुत्र्याने चावा घेतल्यानंतर लसीकरणच नव्हे, तर जखमेची संपूर्ण तपासणी करून घेणे गरजेचे आहे .कधी कधी खोल जखमेला टाके, टिटॅनस इंजेक्शन (TT injection) किंवा अँटिबायोटिक्सची गरज भासते.येथे क्लिक करा