शिळ्या पोळीतून खरंच B12 मिळतं का?

पुढारी वृत्तसेवा

शिळ्या पोळीतून B12 मिळतं?

शिळी पोळी फेकून देण्यापूर्वी ही माहिती नक्की वाचा!

B12 बद्दल एक व्हायरल दावा

शिळ्या पोळीत Vitamin B12 आणि इतर B Group Vitamins वाढतात, असा दावा केला जातो. पण यामागचं सत्य काय आहे?

साधी शिळी पोळी म्हणजे B12चा मोठा स्रोत नाही

सामान्य गव्हाची पोळी फक्त शिळी झाल्याने त्यात मोठ्या प्रमाणात B12 तयार होते, असा ठोस पुरावा नाही. B12 नैसर्गिकरित्या प्रामुख्याने नॉन व्हेज पदार्थांमध्ये आढळते.

मग संशोधनात B12 कसं मिळालं?

काही संशोधनांमध्ये ब्रेड किंवा काही पदार्थांवर विशिष्ट जीवाणूंच्या मदतीने नियंत्रित fermentation केल्यानंतर B12 तयार झाल्याचे दिसून आले आहे.

पोळीचा लाडू आरोग्यासाठी चांगला असू शकतो

पोळी, गूळ आणि तूप यांचा लाडू ऊर्जा देणारा पदार्थ ठरू शकतो. मात्र त्याला B12चा खात्रीशीर स्रोत समजणे योग्य नाही.

B Group Vitamins कुठून मिळतात?

धान्य, कडधान्ये आणि इतर अनेक पदार्थांमधून वेगवेगळे B Group Vitamins मिळू शकतात. पण प्रत्येक B Vitaminचे स्रोत वेगवेगळे असतात.

B12साठी काय खावे?

दूध, दही, पनीर, अंडी, मासे आणि मांस यांसारखे पदार्थ B12चे प्रमुख नैसर्गिक स्रोत आहेत.

शिळी पोळी खाताना स्वच्छतेची काळजी

पोळी योग्य प्रकारे ठेवलेली नसेल किंवा खराब झाली असेल तर ती खाणे टाळावे. वास, बुरशी किंवा खराब दिसल्यास ती खाऊ नका.

खरवस खाण्याचे जबरदस्त फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

येथे क्लिक करा