Salt Expiry Date | मीठ खराब होते का? एक्सपायरी डेट असते का?

पुढारी वृत्तसेवा

मिठाच्या पाकिटावर “Best Before” किंवा एक्सपायरी डेट लिहिलेली दिसते. मात्र सामान्यतः शुद्ध मीठ कधी खराब होत नाही

मिठामध्ये नैसर्गिकरित्या जंतूंची वाढू होऊ शकत नाही. त्यामुळे मीठ हे दीर्घकाळ टिकणाऱ्या पदार्थांपैकी एक आहे

काही प्रकारच्या मिठामध्ये अतिरिक्त आयोडीनयुक्त, अँटी-कैकिंग एजंट, फ्लेवर्ड किंवा हर्बल मीठ असे घटक मिसळलेले असतात.

मीठातील आयोडीन कमी होऊ शकते. त्यामुळे अशा मिठाची गुणवत्ता काही प्रमाणात कमी होते. म्हणून उत्पादक कंपनीकडून “Best Before” कालावधी दिला जातो

साधे शुद्ध मीठ, समुद्री मीठ किंवा खडेमीठाची योग्य प्रकारे साठवणूक केल्यास अनेक वर्षे टिकू शकते

आयोडीनयुक्त मीठ हे साधारणतः १ ते २ वर्षे उत्तम गुणवत्तेसह टिकून राहू राहते, त्यानंतर त्यातील आयोडीनचे प्रमाण कमी होण्यास सुरूवात होते

फ्लेवर्ड मीठ, लसूण, हर्ब्स किंवा मसाले मिसळलेले मीठ लवकर खराब होण्याची शक्यता असते

मीठात गुठळ्या होणे, रंग बदलणे, ओलसर होणे, विचित्र वास येणे, हे बदल ओलावा किंवा चुकीच्या पद्धतीने साठवणूक केल्यामुळे होतात

हवाबंद डब्यात, ओलसर जागेपासून दूर, थेट सूर्यप्रकाशापासून लांब आणि कोरड्या ठिकाणी मीठ ठेवल्यास जास्त दिवस टिकू शकते

येथे क्लिक करा