Rice Diet Weight Loss | महिनाभर भात खाणे सोडल्याने वजन कमी होते का?

अविनाश सुतार

भातामध्ये कार्बोहायड्रेट्स असल्याने सहज पचतात. जर भात खाणे टाळल्यास शरीर कमी कॅलरीजचा वापर करते, ज्यामुळे वजन कमी होऊ शकते

महिनाभर भात खाणे बंद केल्यास काही दिवस जास्त भूक, अशक्तपणा किंवा थोडीशी चिडचिड वाटू शकते. शरीर थोडे सुस्त होते

भात तत्काळ ऊर्जा प्रदान करतो. भात खाणे सोडून दिल्यास सुरुवातीचे काही दिवस थकवा किंवा सुस्ती जाणवू शकते

पांढरा तांदूळ सहज पचत असल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. त्यामुळे महिनाभर भात टाळल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते

मधुमेह किंवा रक्तातील साखरेची समस्या असलेल्यांसाठी हे फायदेशीर आहे. भात टाळल्याने गोड पदार्थांची इच्छा कमी होण्यास मदत होते

भात खाणे सोडून देणे शक्य नसेल तर पर्यायी ब्राऊन राईस खाऊ शकता. त्यामुळे शुगर कंट्रोलमध्ये राहून वजनही कमी होऊ शकते

भातामधील 'व्हिटॅमिन बी' मुळे शरीरात ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते. जर बराच काळ भात खाणे टाळले, तर या व्हिटॅमिनची कमतरता निर्माण होऊ शकते

भात खाणे सोडल्यास शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, डाळी, अंडी आणि दूध या पदार्थांचा आहारात समावेश करा

भात खाणे सोडून दिल्यास सुरुवातीला पोटदुखी किंवा बद्धकोष्ठतेचा अनुभव येऊ शकतो. त्यासाठी भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्यांचा समावेश आहारात करा

येथे क्लिक करा