अविनाश सुतार
बॉलीवूडचा ही-मॅन म्हणून ओळख असलेले धर्मेंद्र रुग्णालयात दाखल असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे
वयाच्या ८९ व्या वर्षीही त्यांनी आरोग्य आणि तंदुरुस्तीला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे
स्वच्छ आणि शुद्ध हवेचा श्वास घेण्यासाठी फार्महाऊसमध्ये राहण्यास ते पसंती देतात
दररोज योगा, नियमित व्यायाम करणे, पाण्यातील व्यायाम करणे, आणि थोडेसे मद्य घेणे, अशी त्यांची जीवनशैली आहे
लवचिकता टिकवण्यासाठी त्यांनी पोहणे आणि फिजिओथेरपी यांचा एकत्रित समावेश आपल्या दिनचर्येत केला होता
त्यांना दुधी भोपळा, झुकिनी या भाज्या खूप आवडतात. त्या स्वतः फार्महाऊसवर पिकवतात आणि बागकाम व शेतीमध्ये सक्रियपणे सहभागी होतात
आपल्या फार्महाऊसवर सेंद्रिय फळे आणि भाज्या उगवतात आणि त्याचाच आहारात समावेश करतात. त्यांनी आपल्या आहारातून साखरेचा पूर्णपणे त्याग केला पाहिजे
योगा आणि अक्वा व्यायाम मला तंदुरुस्त आणि ऊर्जावान ठेवतात. सक्रिय राहणे हेच आपल्या फिटनेसचे रहस्य असल्याचे त्यांनी सांगितले होते
काही वर्षांपूर्वी पडल्यामुळे त्यांनी अक्वा एक्सरसाइज म्हणजेच पाण्यातील व्यायाम सुरू केला आणि ते त्याचा खूप आनंद घेत होते