पुढारी वृत्तसेवा
प्लास्टिकच्या बाटल्यांमुळे कॅन्सर होतो का, याबाबत सोशल मीडियावर अनेक दावे फिरतात.
फूड-ग्रेड प्लास्टिक योग्य वापरल्यास तात्काळ कॅन्सर होत नाही.
काही प्लास्टिकमध्ये BPA (Bisphenol-A) नावाचं केमिकल असतं, जे हार्मोन्सवर परिणाम करू शकतं.
प्लास्टिक बाटली उन्हात ठेवली किंवा गरम पाणी भरलं तर केमिकल्स पाण्यात मिसळू शकतात.
थेट “प्लास्टिक बाटली = कॅन्सर” असं वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध नाही, पण दीर्घकाळ संपर्क हानिकारक ठरू शकतो.
अशा बाटल्यांतून केमिकल्स जास्त प्रमाणात बाहेर पडू शकतात.
BPA Free, ISI मार्क असलेल्या बाटल्या तुलनेने सुरक्षित मानल्या जातात.
पाणी साठवण्यासाठी स्टील किंवा काचेच्या बाटल्या अधिक सुरक्षित.
प्लास्टिकचा गैरवापर टाळल्यास आरोग्यावर होणारा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.