पुढारी वृत्तसेवा
योगासनातील बाळायम योग म्हणून ओळखली जाणारी ही क्रिया, ज्यात दोन्ही हातांच्या नखांना हलकं घासलं जातं.
नखं घासल्याने डोक्यातील नर्व्ह सक्रिय होतात आणि केसांची वाढ वाढते, असा पारंपरिक समज आहे.
या क्रियेने केस वाढतात याचा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही.
रक्ताभिसरण सुधारल्यामुळे काहींना डोक्यात हलकी उब जाणवते, ज्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळू शकतं.
ही प्रक्रिया मन शांत करते, ताण कमी करते. स्ट्रेस कमी झाला तर केस गळणेही कमी होऊ शकते.
Genetic baldness किंवा पूर्ण टक्कल असलेल्या भागात ही क्रिया काहीच परिणाम करत नाही.
फक्त नखं घासून केस घनदाट वाढत नाहीत. आहार, झोप आणि योग्य देखभालही महत्त्वाची.
नखं जोरात घासू नयेत. हलक्या दाबाने ५–१० मिनिटे केल्यास सुरक्षित मानली जाते.
प्रोटीनयुक्त आहार, तेल मसाज, व्हिटॅमिन D–B12, आयुर्वेदिक उपाय व डॉक्टरांचा सल्ला हे उपाय जास्त परिणामकारक.