Heart Blockage Myths Facts | तूप खाल्ल्याने हृदयातील ब्लॉकेज वाढतात का?

पुढारी वृत्तसेवा

हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल, चरबी, दाह (inflammation) आणि इतर पदार्थ साचून प्लाक तयार होतो. या प्रक्रियेला Atherosclerosis म्हणतात

हा प्लाक वाढविल्यास रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि ब्लॉकेज निर्माण होऊन रक्त पुरवठ्यात अडथळे येऊ शकतात

तूप (ghee) खाल्ल्याने हृदयातील ब्लॉकेज थेट वाढतात का? या प्रश्नाचे उत्तर "हो" किंवा "नाही" असे देता येत नाही

तूपाचे प्रमाण, एकूण आहार, जीवनशैली आणि व्यक्तीची आरोग्यस्थिती यावर त्याचा परिणाम अवलंबून असतो

संशोधनानुसार, मध्यम प्रमाणात तूप खाणे, यामुळे हृदयविकाराचा धोका निर्माण होतो, असे ठोसपणे सिद्ध झालेले नाही

बहुतांश लोकांसाठी तूप पूर्णपणे बंद करण्याची गरज नसते, निरोगी व्यक्तीसाठी दिवसाला १–२ टीस्पून (सुमारे ५–१० ग्रॅम) तूप सामान्यतः सुरक्षित मानले जाते

अँजिओग्राफीमध्ये ब्लॉकेज आढळल्यास, स्टेंट बसवलेला असेल, किंवा हृदयविकाराचा झटका आला असेल, तर तूपाचे प्रमाण ठरवण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

तूपामुळे ब्लॉकेज थेट वाढतात असे म्हणता येत नाही. परंतु तूपातील संतृप्त चरबीमुळे जास्त प्रमाणात सेवन केल्यास LDL कोलेस्टेरॉल वाढू शकते

दीर्घकालीन हृदयरोगाचा धोका टाळण्यासाठी प्रमाणात तूप, संतुलित आहार आणि सक्रिय जीवनशैली हेच महत्त्वपूर्ण आहे

येथे क्लिक करा