Ghee Vs Butter | तूप की लोणी? स्वयंपाकासाठी कोणता पर्याय अधिक आरोग्यदायी?

पुढारी वृत्तसेवा

तूप हे शुद्ध केलेले चरबीचे स्वरूप आहे. त्यामध्ये दूधातील प्रथिने (केसीन), लॅक्टोज आणि पाण्याचा अंश काढून टाकलेला असतो

तुपाचा स्मोक पॉइंट (धूर निर्माण होण्याचा बिंदू) जास्त असल्याने ते सहज ऑक्सिडाइझ होत नाही किंवा गरम केल्यावर हानिकारक मुक्त रॅडिकल्स तयार करत नाही

पोषणाच्या दृष्टीने तूप शरीराला जीवनसत्त्वे ए, डी, ई आणि के शोषून घेण्यास मदत करते

लोणी चव वाढवण्यासाठी किंवा पदार्थ सजवण्यासाठी मर्यादित प्रमाणात वापरणे अधिक योग्य ठरते

तेल किंवा लोणी जास्त तापवल्यास त्यातून दाह निर्माण करणारी संयुगे तयार होतात, ज्याचा यकृत, आतडे आणि त्वचेवर नकारात्मक परिणाम होतो

लोण्यात पाणी आणि दूधातील घन पदार्थ असतात. त्यामुळे ते जास्त तापमानावर स्थिर राहत नाही

लोणी तपकिरी होऊ लागले किंवा धूर निघू लागला की त्यातील प्रथिने जळतात आणि दाह निर्माण करणारी संयुगे तयार होतात

लोणी हे ‘फिनिशिंग फॅट’ आहे, ‘कुकिंग फॅट’ नाही. त्याची चव आणि आकर्षण वेगळे असले तरी जास्त तापमानावर वापरण्यास विज्ञान पाठिंबा देत नाही

परिणामी स्वयंपाकासाठी तूप हा अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी पर्याय मानला जातो

येथे क्लिक करा