Anirudha Sankpal
अंडी खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते म्हणून उन्हाळ्यात अंडी खाऊ नये असं म्हणतात. अंडी खाल्ले की उष्णता वाढते असं म्हणतात हे खरं आहे का चला सायन्स पाहूयात काय सांगत.
अंड्यामुळे शरीरात कायमस्वरूपी हीट वाढते याचा ठोस वैज्ञानिक अजिबात नाहीये.
ज्यांना अंडी खाल्ल्याने रॅश येतात त्यांनी मात्र त्याची काळजी घ्यायची, त्यांनी ऑब्जर्व करायचं की एक अंड खाल्ल्याने येते का दोन अंडी खाल्ल्याने रॅशचा त्रास होतो.
अंड्यामध्ये प्रोटीन भरपूर असतं मग प्रोटीन पचवण्यासाठी शरीराला न्यूट्रिएंट म्हणजे इतर न्यूट्रिंट पेक्षा जास्त एनर्जी खर्च करावी लागते.
जास्त ऊर्जा खर्च करावी लागते याला म्हणतात थर्मिक इफेक्ट ऑफ फूड टीएफ, त्यामुळे शरीरात थोड्या वेळासाठी उष्णता निर्माण होण्याची शक्यता असते.
पण याचा अर्थ अंडे उष्ण प्रकृतीचं अन्न आहे आहे आणि त्यामुळे शरीराला आपल्याला अपाय होतो असा अजिबात नाहीये.
उलट ती एनर्जी खर्च केल्यामुळे आपल्याला वेट लॉस करायला मदत होते कारण आपल्याला कॅलरी बर्न करायची आणि ती अंडी खाल्याने चांगली होते.
अंडी खाल्ल्यावर घाम येणं, गरम वाटणं हा वैयक्तिक अनुभव असू शकतो पण तो प्रत्येकामध्ये सारखा असतोच असा नाही.
चार चार अंडी पण खाणारी लोक आहेत आणि त्यांना काहीही गरम वगैरे वगैरे होत नाही. ज्यांना ते पचतय त्यांनी ते कोणत्याही ऋतूत नक्की खावं.