उभे राहून पाणी पिल्यानं गुडघे दुखतात.... शास्त्र काय सांगतं?

Anirudha Sankpal

उभे राहून पाणी पिल्यानं गुडघे दुखी सुरू होते असं अनेक लोकं आपल्याला सांगत असतात.

मात्र खरंच याला काही शास्त्रीय आधार आहे का...? चला जाणून घेऊयात हे खरं आहे का खोटं...?

पाणी अन्ननलिकेद्वारे पोटात जाते आणि त्याचा सांध्यांशी किंवा गुडघ्यांशी थेट संबंध नसतो.

उभारून पाणी पिल्याने गुडघे दुखतात हा लोकांमध्ये असलेल्या गैरसमज आहे.

आयुर्वेद आणि काही पारंपरिक मतांनुसार, उभे राहून पाणी पिल्याने शरीरातील वात आणि कफ दोषांची वाढ होऊ शकते, ज्यामुळे सांधेदुखी वाढते.

अनेकदा पाणी योग्य रीतीने न पिण्यामुळे पचनासंबंधी त्रास निर्माण होतो, ज्याचा अप्रत्यक्ष परिणाम सांध्यांच्या स्वास्थ्यावर होऊ शकतो.

शास्त्रीयदृष्ट्या, गुडघे दुखणे हे मुख्यतः दुखापती, वाढते वय, संधिवाताचे आजार किंवा जास्त वजन यांमुळे होते.

उभे राहून पाणी पिण्याने थेट गुडघे दुखतात, हा सिद्धांत वैद्यकीय क्षेत्रात मान्य केलेला नाही.

तरीही, पचनाच्या सुलभतेसाठी आणि सुरक्षिततेसाठी, पाणी बसून आणि हळूवार प्यावे असा सल्ला दिला जातो.

येथे क्लिक करा