पुढारी वृत्तसेवा
संशोधकांच्या मते, काय खाता याइतकेच 'कधी खाता' हेही मेंदूच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे ठरू शकते.
जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी मधील मज्जाशास्त्रज्ञ (Neuroscientist) मार्क मॅटसन यांच्या संशोधनानुसार, ठराविक काळात उपवास केल्याने मेंदूची कार्यक्षमता सुधारते.
संशोधनात आढळले की, जेवणाची वेळ पुढे ढकलणे किंवा उपवास केल्याने मेंदूत BDNF (Brain-Derived Neurotrophic Factor) नावाचे प्रोटीन वाढते, जे नवीन न्यूरॉन्स तयार करण्यास मदत करते.
साल्क इन्स्टिट्यूट (Salk Institute, California) च्या संशोधनानुसार, ८–९ तासांच्या 'ईटिंग विंडो' (ठराविक तासांनी खाण्यामुळे)मुळे शरीराची नैसर्गिक जैविक घड्याळ सुधारते आणि मेंदूतील जळजळ कमी होते.
संशोधनानुसार, जेवणाच्या वेळांच्या या बदलामुळे स्मरणशक्ती तीव्र होते आणि कामातील एकाग्रता (Focus) कमालीची वाढते.
दुपारच्या वेळी भरपूर जेवल्याने मेंदू मंदावतो. याउलट, हलका आहार किंवा जेवणाची वेळ योग्य रीतीने बदलल्याने 'ब्रेन फॉग' (Brain Fog) आणि आळस दूर होतो.
आहाराच्या वेळा सांभाळल्यास भविष्यात अल्झायमर आणि डिमेंशियासारख्या मेंदूच्या आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते, असे संशोधनात आढळले आहे.
काही तज्ज्ञांच्या मते, झोपण्याच्या किमान ४ तास आधी जेवण पूर्ण करणे मेंदूच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
तज्ज्ञांच्या मते, खाण्याच्या केवळ वेळ बदलणे पुरेसे नाही, तर खाताना पोषक आहाराची निवड करणे तितकेच महत्त्वाचे आहे.