पुढारी वृत्तसेवा
आतड्यांवर कसं काम करतं?
कॅस्टर ऑइलमधील रिकिनोलेइक अॅसिड आतड्यांची हालचाल वाढवतो, त्यामुळे शौच लवकर होते.
आतडी खरंच ‘साफ’ होतात का?
तज्ञांच्या मते कॅस्टर ऑइल फक्त रेचक आहे, डिटॉक्स किंवा आतडी साफ करणारा उपाय नाही.
तात्पुरता आराम मिळतो
बद्धकोष्ठतेत तात्पुरता आराम मिळू शकतो, पण कायमचा उपाय नाही.
अति सेवन धोकादायक
जास्त प्रमाणात घेतल्यास जुलाब, पोटदुखी आणि अशक्तपणा जाणवू शकतो.
डिहायड्रेशनचा धोका
वारंवार वापर केल्यास शरीरातील पाणी आणि मिनरल्स कमी होऊ शकतात.
सर्वांसाठी योग्य नाही
गर्भवती महिला, लहान मुले आणि वृद्धांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये.
आतडी निरोगी ठेवण्याचा योग्य मार्ग
फायबरयुक्त आहार, पाणी, व्यायाम आणि प्रोबायोटिक्स अधिक सुरक्षित आहेत.
तज्ञांचा सल्ला महत्त्वाचा
कॅस्टर ऑइल नियमित वापरण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.