Alcohol Belly Fat: मद्यपान केल्यानं पोट का वाढतं? ८ महत्वाची कारणे

Anirudha Sankpal

१. शरीर दारूला विषारी पदार्थ मानून त्याचे विघटन करण्यास प्राधान्य देते, ज्यामुळे चरबी आणि कर्बोदके पोटाभोवती साठू लागतात.

२. अल्कोहोलमध्ये उच्च कॅलरीज असतात; उदा. एका बिअरमध्ये १५० ते २०० कॅलरीज असल्याने शरीरात अतिरिक्त कॅलरीज जमा होतात.

३. दारूसोबत खाल्ले जाणारे चखणा, जंक फूड आणि फास्ट फूड यामुळे शरीराला अतिरिक्त कॅलरीज मिळून लठ्ठपणा वाढतो.

४. अल्कोहोल लिव्हरवर थेट परिणाम करते, ज्यामुळे शरीराचे 'फॅट मेटबॉलिझम' बिघडते आणि पोटाभोवती चरबी वाढते.

५. अल्कोहोलमुळे शरीरातील 'व्हिसरल फॅट' वाढते, जे लिव्हर आणि किडनीसारख्या महत्त्वाच्या अवयवांभोवती साठल्याने पोट फुगते.

६. दारूमुळे तृप्तीची भावना निर्माण करणाऱ्या हार्मोन्सवर परिणाम होतो, परिणामी भूक वाढून रात्री उशिरा खाण्याची इच्छा होते.

७. नियमित मद्यपानामुळे शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते आणि कॉर्टिसॉल (स्ट्रेस हार्मोन) वाढते, ज्यामुळे पोट वाढते.

Plastic Bottle Alcohol | Pinerest Photo

८. कॉर्टिसॉल वाढल्यामुळे शरीराला पोटाभोवती चरबी साठवण्याचा संकेत मिळतो, ज्यामुळे मद्यपान करणाऱ्यांचे पोट सुटते.

Alcohol Drinking | pudhari
येथे क्लिक करा