Namdev Gharal
(Henry) हेन्री ही जगातील सर्वात जास्त वय असलेली व जिवंत असलेली मगर असून आज याचे वय १२५ वर्षे आहे
नर जातीची ही मगर नाईल क्रोकोडाईल (क्रोकोडायलस निलोटिकस) प्रजातीची आहे
या मगरीला १९०३ मध्ये बोत्सवानाच्या ओकावांगो येथे पकडण्यात आले होते
या मगरीचा जन्म १९०० मध्ये झाल्याचा संशोधकांचा अदाज आहे पकडला त्यावेळी ही ३ वर्षाची होती
दक्षिण आफ्रीकेतील स्कॉटबर्ग येथील क्रोकवर्ल्ड संवर्धन केंद्रात सध्या ही मगर आहे
प्रचंड आकाराच्या या मगरीचे वजन ७०० किलो असून लांबी १६.४ फूट इतकी आहे
जीवशास्त्रज्ञ स्टीवन ऑस्टॅड यांनी लाईव्ह सायन्सला दिलेल्या मुलाखतीत याचे वय निश्चित सांगता येत नाही पण हेन्रीचे वय १३० च्या आसपास असल्याचे मत आहे.
प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक व टिव्ही अँकर स्टिव्ह बॅकशाल (steve backshall) यांनी या मगरीवर विषेश शो केला आहे.
क्रोकवर्ल्ड संवर्धन प्रजनन केंद्रात आतापर्यंत हेन्री (Henry) हा १०,००० मगरींच्या पिलांचा पिता ठरला आहे
इतकी वर्षे होऊनही हेन्री अजूनही हेल्थी आहे संशोधकांच्या मते त्याची अजूनही वाढ होत आहे.