अविनाश सुतार
ग्रेट व्हाईट शार्क
ग्रेट व्हाईट शार्क हा समुद्रातील सर्वात भयानक शिकारींपैकी एक आहे. या शार्ककडून माणसांवर अनेकदा हल्ले होतात
बॉक्स जेलीफिश
बॉक्स जेलीफिश उष्णकटिबंधीय समुद्रातील पाण्यात शांतपणे तरंगतात, त्यांच्या स्पर्शकांमध्ये प्राणघातक विष असते. ते हृदयविकाराने मृत्यू घडवू शकतात
सॉल्टवॉटर क्रोकोडाईल (खाऱ्या पाण्याचा मगरी)
सॉल्टवॉटर क्रोकोडाईल हा समुद्र आणि त्याच्या परिसरातील सर्वात मोठा सरपटणारा शिकारी आहे. या मगरी माणसांवर हल्ले करतात
ब्लू-रिंग्ड ऑक्टोपस
ब्लू-रिंग्ड ऑक्टोपस आकाराने लहान असून त्यांचे विषारी गुणधर्म माणसांसाठी घातक ठरतात. दंश झाल्यास काही मिनिटांतच लकवा किंवा मृत्यू होऊ शकतो
स्टोनफिश
स्टोनफिश हा जगातील सर्वात विषारी मासा आहे. व्यक्तीचा त्यांच्यावर पाय पडल्यास तीव्र वेदना, ऊतकांचे नुकसान होऊन मृत्यूही होऊ शकतो
टायगर शार्क
टायगर शार्क आकाराने मोठे आणि भयंकर शिकारी असतात. ते कमी खोलीच्या पाण्यातही पोहतात
कोन स्नेल (शंख प्रकारातील सापासारखा प्राणी)
कोन स्नेल हे समुद्रातील गोगलगायांसारखे दिसतात, पण हे अत्यंत विषारी असतात. त्यांचे विष मानवांमध्ये लकवा आणि मृत्यू घडवू शकते
बुल शार्क
बुल शार्क कमी खोलीच्या पाण्यात पोहतात, त्यामुळे हल्ल्याची शक्यता वाढते. त्यांचा आक्रमक स्वभाव त्यांना अत्यंत धोकादायक बनवतो
पोर्तुगीज मॅन ओ’ वॉर
पोर्तुगीज मॅन ओ’ वॉर हा जेलीफिशसारखा दिसतो, पण प्रत्यक्षात तो एकत्र राहणाऱ्या लहान जीवांचा समूह असतो. त्याचे लांब स्पर्शक अतिशय वेदनादायक दंश करतात