पुढारी वृत्तसेवा
दिवसभरात किती पाणी प्यावे यावर दिवसातून आठ ग्लास किंवा तीन लिटर पाणी पिण्याचा सल्ला सर्वाधिक दिला जातो
पुरुष आणि महिलांची शारीरिक रचना वेगवेगळी असल्याने त्यांच्या पाणी पिण्याच्या प्रमाणात आणि शरीराची पाण्याची गरज पूर्ण करण्यामध्येही फरक असतो
शरीराला किती पाण्याची आवश्यकता आहे, हे व्यक्तीचे वजन, शारीरिक हालचाली, हवामान आणि आरोग्याची स्थिती यावर अवलंबून असते
घाम, लघवी आणि श्वासोच्छ्वासाद्वारे शरीरातून बाहेर पडणारे पाणी भरून काढणे आवश्यक असते
शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी पिणेही आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. याला 'ओव्हरहायड्रेशन' किंवा 'वॉटर इंटॉक्सिकेशन' असे म्हणतात
अधिक पाणी झाल्यास रक्तातील सोडियमचे प्रमाण कमी होऊन गोंधळल्यासारखे वाटणे, मळमळणे किंवा अशक्तपणा जाणवणे अशी लक्षणे दिसू शकतात
डॉक्टरांच्या मते, पुरुषांनी दिवसाला सरासरी ३ ते ३.७ लिटर, तर महिलांनी सुमारे २.५ ते २.७ लिटर पाणी पिण्याचा सर्वसाधारणपणे सल्ला दिला जातो
डॉक्टरांच्या मते, जवळ पाण्याची बाटली ठेवा, दिवसभर थोडे-थोडे पाणी प्या आणि हवामान तसेच शारीरिक हालचालींनुसार पाण्याचे प्रमाण ठरवा
साखरयुक्त पेये आणि कॅफिनचे अतिप्रमाणातील सेवन टाळणे योग्य ठरते. अशा पेयांमुळे शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडू शकते