स्वालिया न. शिकलगार
चिया सीड्स वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी
हे थेट चरबी कमी करत नसले, तरी वजन घटवण्यासाठी ते मदत करतात.
यामध्ये फायबर असते. पाण्यात भिजवल्यावर ते फुगतात, ज्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते
वारंवार खाण्याची इच्छा होत नाही. कॅलरी सेवन आपोआप कमी होते.
यात भरपूर प्रोटीन आणि ओमेगा-३ फॅटी एसिड्स असतात.
हे घटक शरीराचे Metabolism वेगवान करतात.
चिया सीड्स पचायला वेळ लागतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते
परिणामी, गोड किंवा जंक फूड खाण्याची इच्छा होत नाही.
१ छोटा चमचा चिया सीड्स एका ग्लास पाण्यात अर्धा तास भिजवून ठेवा
हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास वजन कमी करण्यास मोठी मदत होते.