अंजली राऊत
कापड आणि मखमली झाकलेले सोफे इतके घाणेरडे होऊ शकतात की, ते कसे स्वच्छ करायचे हे आव्हान असते, तर पैसे खर्च न करता स्वच्छ करण्याचे काही सोपे मार्ग आहेत.
व्हॅक्यूम क्लिनर हा सोफा स्वच्छ करण्याचा एक सोपा मार्ग आहे. जर तुमच्याकडे हे इलेक्ट्रॉनिक क्लिनिंग उपकरण असेल, तर तुम्ही तुमच्या सोफ्याच्या प्रत्येक कोपऱ्यातील धूळ आणि घाण काढण्यासाठी त्याचा वापर करू शकता. त्यामुळे तुमचा नवीन सोफा घाणेरडा होण्यापासून रोखेल.
ब्रश किंवा स्वच्छ सुती कापड वापरा
कापड आणि कव्हरवर धूळ आणि घाण साचू नये म्हणून दर आठवड्याला ब्रश किंवा स्वच्छ सुती कापडाने सोफा स्वच्छ करा. पण दुर्लक्ष झाले हलके किंवा पांढरे सोफे लवकर घाणेरडे होतील.
लिंबू आणि शाम्पू वापरा
एका भांड्यात पाणी भरा. त्यात थोडासा लिंबाचा रस आणि सौम्य शाम्पू घाला. चांगले मिसळून फेस तयार करा. या द्रवात एक स्वच्छ कापड बुडवा, ते पिळून घ्या आणि सोफा सेटचे लाकडी भाग स्वच्छ करण्यासाठी वापरा. आता, हँडल पुन्हा पुसण्यासाठी दुसरे स्वच्छ, कोरडे कापड वापरा.
लेदर सोफा सेटसाठी
लेदर सोफा सेट असेल तर तुम्ही या पाण्याने संपूर्ण सोफा पुसू शकतात. लेदरला चिकटलेली सर्व घाण निघून जाईल, ज्यामुळे सोफा पुन्हा चमकेल. घरातील इतर लाकडी फर्निचर, बेड आणि कपाटे स्वच्छ करण्यासाठी देखील या पाण्याचा वापर करू शकता.
लिंबू आणि बेकिंग सोड्याचा वापर
लिंबू आणि बेकिंग सोड्यानेही डाग काढू शकता. एक टेबलस्पून बेकिंग सोडा, अर्ध्या लिंबाचा रस आणि थोडेसे पाणी मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट डागावर लावा. दहा मिनिटांनंतर, ओल्या कापडाने पुसून टाका. सोफ्यांवरून तेल आणि मसाल्याचे डाग काढण्यासाठी हे खूपच चांगले आहे
व्हिनेगर वापरु शकता
एका बाटलीत समान प्रमाणात पाणी आणि पांढरा व्हिनेगर मिसळा. ते सोफ्यावर हलकेच शिंपडा, नंतर, ते मायक्रोफायबर कापडाने पुसून टाका. यामुळे दुर्गंधी आणि बॅक्टेरिया निघून जातील.
टी बॅगची युक्ती
जर तुमच्याकडे कापडी सोफा असेल तर टी बॅगची युक्ती वापरून पहा. चहा बनवल्यानंतर ती फेकून देऊ नका. ती थंड होऊ द्या. टी बॅग अशा पृष्ठभागावर ठेवा जी विशेषतः घाणेरडी असेल किंवा वास येत असेल. ती 30 मिनिटे तसेच राहू द्या. त्यामुळे वास आणि धूळ शोषून घेईल.
ऑलिव्ह ऑइल आणि व्हिनेगर
लेदर सोफा स्वच्छ करण्यासाठी, ऑलिव्ह ऑइल आणि व्हिनेगर वापरा. एक कप व्हिनेगर आणि अर्धा कप ऑलिव्ह ऑइल घ्या. ते मिसळा. हे मिश्रण स्वच्छ सुती कापडावर लावा आणि सोफा पूर्णपणे पुसून टाका. नंतर, कोरड्या कापडाने पुसून टाका. यामुळे लेदरवरील घाण निघून जाईल आणि चमकही येईल.