Diwali and Acidity : दिवाळीत ॲसिडिटी का वाढते? जाणून घ्या पित्त कमी करणारे सोपे घरगुती उपाय

पुढारी वृत्तसेवा

दिवाळीत सण म्‍हटलं की, तोंडाला पाणी आणणारा खमंग फराळ खाण्‍याचा मोह आवरत नाही.

या काळात आहारातील बदलामुळे अनेकांना पित्ताचा (ॲसिडिटीचा) तीव्र त्रास सहन करावा लागतो.जाणून घेऊया यामागची कारणे आणि उपाय.

दिवाळीच्‍या धामधुमीत उशिरा जेवण, रात्री फराळाचे पदार्थ खाणे, अति गोड, तेलकट, तुपकट आणि मसालेदार पदार्थांमुळे ॲसिडिटीचा त्रास वाढतो.

दिवाळी सणासाठी बनवलेले काही पदार्थ मैद्याचे, तेलकट किंवा जास्त साखरयुक्त असतात. ते पचायला जड असतात. पोटातील आम्लता (Acid) वाढवतात.

दिवाळीत भरपूर पाणी प्या. तेलकट फराळासोबत ताजे ताक, कोमट पाणी किंवा लिंबू पाणी घेतल्यास पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते.

फक्त गोड आणि तेलकट फराळ खाण्याऐवजी आहारात फळे, हिरव्या पालेभाज्या आणि सॅलडचा आवर्जून समावेश करा.

पित्ताचा त्रास सुरू झाल्यास ताजे ताक पिणे किंवा जिऱ्याचे पाणी पिणे गुणकारी ठरते. हे पोट थंड ठेवते आणि जळजळ तात्काळ कमी करते.

जेवल्यानंतर किंवा फराळ खाल्ल्यावर जड वाटत असल्यास, थोडे ओवा आणि बडीशेप चघळा.

फराळाचा आनंद घ्या, पण खाल्ल्याबरोबर लगेच झोपू नका. रात्रीच्या जेवणात आणि झोपण्यात कमीत कमी २ तासांचे अंतर ठेवा.

सणाच्‍या धामधुमीतही रात्री जेवल्‍यावर शतपावलीची सवय कायम ठेवा.

घरगुती उपायांनीही पित्ताचा त्रास थांबत नसेल तर दुर्लक्ष न करता ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या!

येथे क्‍लिक करा.