दिशा पटानीचा आज ३३ वा वाढदिवस आहे. तिचा जन्म १३ जून १९९२ रोजी उत्तर प्रदेशातील बरेली येथे झाला..तिचे वडील जगदीश सिंह पटानी हे यूपी पोलिसात डीएसपी आहेत आणि तिची आई आरोग्य विभागात अधिकारी आहे..दिशा पटानी ही बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि ग्लॅमरस अभिनेत्री मानली जाते. .दिशा पटानीने बॉलिवूडमध्ये तिच्या कारकिर्दीची सुरुवात एमएस धोनी या चित्रपटातून केली..या चित्रपटात ती धोनीच्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत दिसली होती. यामुळे ती रातोरात स्टार झाली..दिशाला वाढदिवसानिमित्त मौनी रॉयने शुभेच्छा दिल्या आहेत. माझ्या सर्वात सुंदर बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, असे मौनीने म्हटले आहे. .दिशाने लखनऊच्या अॅमिटी युनिव्हर्सिटीमधून बायोटेक्नॉलॉजीमध्ये अभियांत्रिकीची सुरुवात केली, परंतु दुसऱ्या वर्षातच तिने शिक्षण सोडले..मुंबईत आले तेव्हा ५०० रुपये सोबत होते. सुरुवातीच्या काळात घराचे भाडे भरण्यासाठीही पैसे नव्हते, असे दिशाने एका मुलाखतीत सांगितले होते..आज तिला बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. .रश्मिकाचा ‘कुबेरा’च्या प्रमोशनसाठी खास पारंपरिक लूक