laptop on your lap: सावधान! लॅपटॉप मांडीवर ठेवून काम करण्याने येऊ शकतं वंध्यत्व?

Anirudha Sankpal

लॅपटॉपमधून निघणारी उष्णता आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा थेट परिणाम शरीरावर होतो, हे अनेक संशोधनांतून सिद्ध झाले आहे.

पुरुषांमध्ये वंध्यत्व

लॅपटॉपच्या उष्णतेमुळे वृषणांचे तापमान वाढते, ज्याचा थेट परिणाम शुक्राणूंच्या निर्मितीवर आणि गुणवत्तेवर होऊन वंध्यत्वाचा धोका वाढू शकतो.

त्वचेचे विकार

दीर्घकाळ मांडीवर गरम लॅपटॉप ठेवल्याने 'एरिथेमा अब इग्ने' (Erythema ab igne) हा त्वचेचा विकार होऊ शकतो, जो अत्यंत दुर्मिळ स्थितीत कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतो.

बॅड पोश्चर आणि मानदुखी

मांडीवर लॅपटॉप असल्याने सतत खाली झुकून पाहावे लागते, ज्यामुळे मणक्यावर ताण येऊन 'टेक्स्ट नेक' आणि मानदुखीच्या समस्या उद्भवतात.

डोळ्यांवर ताण

लॅपटॉप जवळ आणि चुकीच्या कोनात असल्याने डोळ्यांचे स्नायू थकतात, ज्यामुळे डोळे कोरडे पडणे आणि दृष्टी धूसर होण्याचे विकार होऊ शकतात.

स्लीप सायकलवर परिणाम

रात्री उशिरा मांडीवर लॅपटॉप घेऊन काम केल्याने त्यातून निघणारा 'निळा प्रकाश' मेलाटोनिन हार्मोनवर परिणाम करून झोपेचे गणित बिघडवतो.

खबरदारीचा उपाय

लॅपटॉप नेहमी टेबलवर ठेवून किंवा 'लॅपटॉप स्टँड'चा वापर करून वापरणे आरोग्यासाठी सर्वात सुरक्षित मानले जाते.

येथे क्लिक करा