पुढारी वृत्तसेवा
कचरा समजून फेकू नका
रस काढून झाल्यावर आपण अनेकदा लिंबाची साल कचऱ्यात फेकून देतो, पण त्यात रसापेक्षा जास्त पोषक तत्वे असतात.
व्हिटॅमिनचा खजिना
लिंबूच्या सालीमध्ये व्हिटॅमिन-सी आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते, जे हाडांच्या मजबुतीसाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
त्वचेसाठी वरदान
सालीचा वापर चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी आणि त्वचा चमकदार करण्यासाठी 'नॅचरल स्क्रब' म्हणून करता येतो.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
यात असलेले अँटी-ऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) वाढवण्यास मदत करतात.
दातांचे आरोग्य
हिरड्यांमधून रक्त येणे किंवा दातांच्या समस्या असल्यास लिंबाची साल घासल्याने आराम मिळतो.
वजन कमी करण्यास मदत
लिंबूच्या सालीमध्ये 'पेक्टिन' असते, जे शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्यास आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
स्वयंपाकात असा करा वापर
साली वाळवून त्याची पावडर बनवा; ही पावडर केक, सॅलड किंवा चहामध्ये वापरल्याने एक वेगळीच चव येते.
घरातील स्वच्छतेसाठी
तांब्या-पितळेची भांडी चमकवण्यासाठी किंवा घरातील दुर्गंधी घालवण्यासाठी लिंबाची साल एक उत्तम नैसर्गिक पर्याय आहे.