पुढारी वृत्तसेवा
अनेक लोकांना घरात डायनिंग टेबल कोणत्या दिशेला ठेवावा, हा प्रश्न असतो.
वास्तुशास्त्रानुसार, डायनिंग टेबल नेहमी स्वयंपाकघरात ठेवणे सर्वोत्तम मानले जाते.
डायनिंग टेबलची दिशा नेहमी वायव्य (उत्तर-पश्चिम) किंवा पश्चिम असावी.
जेवण करताना कोणत्याही व्यक्तीचे तोंड पूर्व दिशेकडे असावे. असे केल्याने घरात समृद्धी येते आणि नकारात्मकता दूर राहते.
वास्तुशास्त्रानुसार, डायनिंग टेबल कधीही पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवू नये.
जेवण करताना कोणत्याही व्यक्तीचे तोंड दक्षिण दिशेकडे नसावे.
डायनिंग टेबल निवडताना कोपरे तीक्ष्ण नसावेत याची काळजी घ्यावी.
डायनिंग टेबलचे कोपरे नेहमी गोलाकार असावेत.
लाकडी डायनिंग वास्तुशास्त्रानुसार टेबल सर्वोत्तम मानले जाते.
टीप: ही माहिती केवळ मार्गदर्शनासाठी असून, ती इंटरनेट स्रोतांवर आधारित आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कृपया संबंधित तज्ज्ञ किंवा व्यावसायिकांचा सल्ला घ्यावा.