स्वालिया न. शिकलगार
अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी मुलांसाठी लिहिलेल्या अनेक कथांमधील बोक्या सातबंडे काल्पनिक पात्र आहे
मुळात ते नभोनाट्य होतं आणि रेडिओसाठी ते तयार करण्यात आलं होतं, आणि त्याला प्रचंड यश आलं. यावर पुस्तके आणि सिनेमाही आला
यामागची दिलीप प्रभावळकर यांनी कहाणी सांगितली, ते म्हणाले- 'मुंबईच्या मुलांच्या कार्यक्रमाचे माधव कुलकर्णी होते'
'मी म्हणालो, आता टीव्ही आलाय, आता रेडिओ कोण ऐकतं?'
'कुलकर्णींनी मला दम दिला..म्हणाले, शहाणपणा करून नकोस..तू लिही'
'मी बसून बोक्या सातबंडे एक पात्र आणि त्याची फॅमिली तयार केली आणि ती मालिका प्रचंड गाजली'
'पुन्हा नभोनाट्यासाठी मी कुलकर्णींकडे गेलो, तेव्हा त्यांनी कपाटातून पत्रांचा ढिग काढला..म्हणाले-नुसतं चाळ'
'सगळी पत्रे मोठ्या शहरांतून आलेली होती, जिथे टीव्ही पोहोचली होती'