Vishal Bajirao Ubale
आज फोन आपल्या कामाचा, अभ्यासाचा, आणि जगाशी जोडणारा महत्वाचा भाग आहे. म्हणून डिटॉक्सचा अर्थ फोन टाळणे नाही, तर त्याच्या वापरावर आपलं नियंत्रण ठेवणे आहे. फोन हातात घेताना एकच प्रश्न विचारा: “मी खरंच काही कामासाठी घेतोय, की ही फक्त सवय आहे?”
प्रत्येक छोटी ‘टिंग’ तुमचं लक्ष वेधून मानसिक ऊर्जा खाऊन टाकते. दिवसाच्या शेवटी थकवा जाणवतो याचं मुख्य कारण हेच. यावर सोप्पा उपाय सोशल मीडिया, गेम्स, शॉपिंग,अनावश्यक ॲप्स यांची नोटिफिकेशन्स कायमची बंद करा. फक्त कॉल आणि महत्वाचे मेसेज पुरेसे असतात.
फोनमधून येणारा निळा प्रकाश झोप हलकी करतो. उठल्यावर थकवा येतो, अभ्यासात लक्ष लागत नाही. काय करायचं? • झोपण्याआधी किमान १ तास स्क्रीन नाही • बेडरूममध्ये फोन नाही • एक साधं अलार्म घड्याळ वापरा. झोप खूप सुधारते.
जेवताना किंवा बोलताना फोन हातात आला की लक्ष आपण खातो त्यावरच राहत नाही. यासाठी दिवसात किमान ३० मिनिटे तरी फोन बाजूला. घरात आल्यावर फोन एका ठराविक जागी ठेवा. मन शांत आणि हलकं वाटतं.
अचानक फोन उचलायची इच्छा झाली तर लगेच स्पर्श करू नका. ३ खोल श्वास घ्या. हा छोटासा ब्रेक तुमची “ऑटोमॅटिक” सवय थांबवतो. वापर कमी होतो, नियंत्रण वाढतं.
फक्त ३–४ महत्वाचे ॲप्स ठेवा. बाकी ॲप्स फोल्डरमध्ये लपवा. स्क्रीन शांत दिसते आणि आकर्षण कमी होतं.
फोन काळा-पांढरा केला की फोटो, रील्स, स्क्रोलिंग मजेदार वाटत नाही. मेंदूचा मोह कमी होतो. एकदा सेटिंग्जमध्ये ग्रेस्केल वापरून बघा – फरक लगेच जाणवेल.
कुठल्या ॲपमध्ये वेळ जास्त जातो ते पाहा. दिवसाची मर्यादा ठरवा. मर्यादा संपली की ॲप थांबतं, अभ्यासात फोकस मोठ्या प्रमाणात सुधारतो.
फोन बाजूला ठेवल्यावर कंटाळा येतो – हे नॉर्मल आहे. त्यावर शांत पर्याय निवडा, जसे • वाचन • चालणे • पाणी पिणे • डायरी लिहिणे • खिडकीत बसणे.
• dopamine कमी → स्क्रोल कमी • नोटिफिकेशन नाही → मेंदू शांत
• झोप चांगली → सकाळी ऊर्जा • माहिती कमी → एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती सुधारते