Expiry Date Vs Best Before: एक्सपायरी डेट अन् बेस्ट बिफोर मधील फरक काय... कोणतं जास्त धोकादायक?

Anirudha Sankpal

बहुतांश लोक या दोन्ही गोष्टींचा अर्थ एकच समजतात, पण प्रत्यक्षात यामध्ये मोठा फरक असतो.

'बेस्ट बिफोर'चा अर्थ असा की, दिलेल्या तारखेपर्यंत त्या पदार्थाची चव, सुवास आणि गुणवत्ता उत्तम राहील.

ही तारीख निघून गेल्यावरही तो पदार्थ लगेच खराब किंवा विषारी बनत नाही, तो खाणे सुरक्षित असू शकते.

मात्र, 'बेस्ट बिफोर' तारीख संपल्यानंतर त्या पदार्थाची चव, रंग किंवा कुरकुरीतपणा थोडा कमी होऊ शकतो.

याउलट, 'एक्सपायरी डेट'चा अर्थ पूर्णपणे वेगळा असून ती थेट आरोग्याशी आणि सुरक्षिततेशी संबंधित असते.

ब्रेड, दूध, दुग्धजन्य पदार्थ किंवा औषधे यांसारख्या लवकर खराब होणाऱ्या गोष्टींवर 'एक्सपायरी डेट' लिहिलेली असते.

ही तारीख संपल्यानंतर तो पदार्थ अजिबात खाऊ नये, कारण त्यात हानिकारक बॅक्टेरिया (जीवाणू) तयार होण्याची शक्यता असते.

एक्सपायरी डेट संपलेले पदार्थ खाल्ल्यास शरीराला अपाय होऊन 'फूड पॉयझनिंग' (अन्नबाधा) होण्याचा मोठा धोका असतो.

येथे क्लिक करा