पुढारी वृत्तसेवा
बॉलिवूडमधील या दोन स्टार्सचं नातं नेमकं काय आहे?
इमरान हाश्मी आणि आलिया भट्ट दोघेही बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकार आहेत. पण त्यांच्यात केवळ फिल्म इंडस्ट्रीचं नातं नाही. त्यांचं एक खास कौटुंबिक नातंही आहे.
विशेष म्हणजे इमरान आणि आलियाने आजवर एकत्र चित्रपटात काम केलेलं नाही.
इमरान हाश्मी आणि आलिया भट्ट हे एकमेकांचे चुलत भाऊ-बहीण असल्याचं सांगितलं जातं. त्यांच्या कुटुंबातील नात्याची कहाणी अनेकांना माहितीही नाही.
इमरान हाश्मी यांच्या आजी पूर्णिमा यांचं खरं नाव मेहरबानो मोहम्मद अली होतं. त्या त्यांच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या.
पूर्णिमा आणि महेश भट्ट यांच्या आई शिरीन मोहम्मद अली या सख्ख्या बहिणी होत्या. यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये जवळचं नातं तयार झालं.
महेश भट्ट आणि इमरानचे वडील अनवर हाश्मी हे भाऊ होते. त्यामुळे आलिया भट्ट आणि इमरान हाश्मी हे चुलत भाऊ-बहीण आहेत.
इमरान यांच्या आजी पूर्णिमा यांनी 1940 च्या दशकापासून हिंदी चित्रपटांत काम केलं. त्या अमिताभ बच्चन यांच्या ‘जंजीर’ चित्रपटातही दिसल्या होत्या.
सध्या इमरान हाशमी ‘आवारापन 2’ मुळे चर्चेत आहेत. तर आलिया भट्टही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
एकाच फिल्म इंडस्ट्रीत काम करूनही इमरान आणि आलियाची जोडी पडद्यावर कधी दिसली नाही.
पण पडद्यामागे मात्र दोघांना जोडणारं आहे एक खास कौटुंबिक नातं आहे.