Diamond Rain : 'या' दोन ग्रहांवर पडतो हिऱ्यांचा पाऊस! काय आहे यामागील रहस्य?

पुढारी वृत्तसेवा

आपल्या सौरमंडळात अनेक गोष्टी आजही एक रहस्य आहेत.

संशोधनानुसार, युरेनस (Uranus) आणि नेपच्यून (Neptune) या दोन ग्रहांवर चक्क हिऱ्यांचा पाऊस पडतो.

युरेनस आणि नेपच्यून सौरमंडळातील सर्वात दूरचे ग्रह म्हणून ओळखले जातात. त्यांचा व्यास सुमारे ५१,००० किलोमीटर इतका प्रचंड आहे.

मिथेन वायूपासून हिऱ्यांची निर्मिती या ग्रहांचे वातावरण मिथेन (CH4) वायूने भरलेले आहे. हे ग्रह वायू आणि बर्फापासून बनलेले असून येथे अत्यंत जास्त दाब आणि तापमान आढळते.

मिथेनमध्ये कार्बन हा हिऱ्याचा मुख्य घटक असतो. विशेष म्हणजे, या ग्रहांच्या वरच्या वातावरणात मिथेन वायू सुमारे २ टक्क्यांपर्यंत आढळतो.

रेणूंचे (मॉलेक्युल्स) तुटणे युरेनस आणि नेपच्यूनच्या अंतर्गत भागात लाखो पटीने जास्त दाब असतो. या प्रचंड दाबामुळे मिथेनचे रेणू तुटतात. त्यातून कार्बनचे अणू वेगळे होऊन त्यांचे समूह तयार होतात. हीच हिऱ्यांच्या निर्मितीची पहिली पायरी आहे.

या ग्रहांच्या खोलवरच्या थरांमध्ये तापमान 2000 ते 5000 अंश सेल्सियस पर्यंत पोहोचते. या प्रचंड तापमानामुळे कार्बनचे रूपांतर हिऱ्यांच्या स्फटिकांमध्ये (Crystals) होते.

कार्बनचे समूह तुटलेल्या मिथेनमधून बाहेर पडलेले कार्बनचे अणू एकमेकांशी जोडले जाऊन समूह तयार करतात. हळूहळू या समूहांचे रूपांतर स्फटिकमय (क्रिस्टल) संरचनेत होते, यामुळे हिरे तयार होतात.

हिऱ्यांचे स्फटिक गुरुत्वाकर्षणामुळे वरच्या वातावरणातून आतल्या बाजूला खाली पडतात. या प्रक्रियेला वैज्ञानिक 'डायमंड रेन' (Diamond Rain) म्हणजेच 'हीऱ्यांचा पाऊस' म्हणतात. ही प्रक्रिया सतत चालू असते.

अतिउच्च दाब, गोठवणारी थंडी आणि पृथ्वीपासूनचे प्रचंड अंतर यामुळे हे हिरे गोळा करणे मानवांसाठी अशक्य आहे.

येथे क्‍लिक करा.