Diabetes and sleep|मधुमेह टाळण्यासाठी रात्री 'किती' तास झोप आवश्‍यक, जाणून घ्‍या नवीन संशोधन

पुढारी वृत्तसेवा

बदलती जीवनशैली आणि तणावामुळे मधुमेहाचा (टाइप २ डायबेटिस) धोका वाढत आहे.

'BMJ ओपन डायबेटिस रिसर्च अँड केअर' या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, झोप आणि शरीरातील चयापचय क्रिया (Metabolism) यांचा जवळचा संबंध आहे.

संशोधकांनी २००९ ते २०२३ दरम्यानच्या २३,४७५ नागरिकांच्या डेटाचे विश्लेषण केले. यामध्ये असे आढळले की, झोप आणि आरोग्याचा संबंध 'उलट्या U' (Inverted U-shape) आकाराचा असतो.

खूप कमी किंवा खूप जास्त झोपणे या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.

ताज्या अभ्यासानुसार, दररोज ७ तास १९ मिनिटांची झोप घेतल्यास शरीरातील इन्सुलिन रोधकता कमी होऊन मधुमेहाचा धोका लक्षणीयरीत्या घटवता येऊ शकतो.

विशेष म्हणजे, आठवडाभर कमी झोपून विकेंडला (शनिवार-रविवार) जास्त झोप घेतल्याने हा धोका कमी होण्याऐवजी वाढू शकतो, असा इशाराही या संशोधनात देण्यात आला आहे.

रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी ७ तास १९ मिनिटे ही झोपण्याची सर्वोत्तम वेळ आहे.

जेव्हा शरीरातील पेशी इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नाहीत, तेव्हा रक्तातील साखर वाढते. योग्य झोप ही प्रक्रिया रोखण्यास मदत करते.

संशोधकांनी सावध केले आहे की, झोप आणि मधुमेह यांचा परस्परांशी संबंध आहे. साखरेचे प्रमाण बिघडल्यास झोपेत अडथळे येतात आणि झोप नीट न झाल्यास साखरेचे प्रमाण आणखी वाढते. यामुळे एक 'दुष्टचक्र' तयार होते.

येथे क्‍लिक करा.