पुढारी वृत्तसेवा
हिमाचल प्रदेशातील नयनरम्य धर्मशाळा हे एक निसर्गरम्य गिरीस्थान असून, येथे समृद्ध तिबेटी संस्कृती आणि शांत नैसर्गिक परिसर यांचा अनुभव मिळतो. येथील प्रमुख 10 ठिकाणांविषयी जाणून घ्या...
मॅक्लॉडगंज : 'छोटा ल्हासा' म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण दलाई लामा यांचे निवासस्थान आहे. येथे तिबेटी संस्कृतीची समृद्ध परंपरा पाहायला मिळते.
नामग्याल मठ : हा दलाई लामा यांचा वैयक्तिक मठ आहे. ध्यान (Meditation) आणि बौद्ध धर्माचे शिक्षण घेण्यासाठी हे एक अत्यंत शांत आणि पवित्र ठिकाण आहे.
भग्शु धबधबा हा भग्शुनाथ मंदिराजवळ असलेला हा नयनरम्य धबधबा आहे. ट्रेकिंगसाठी आणि निसर्गप्रेमींसाठी हे उत्तम ठिकाण आहे.
त्रिउंड ट्रेक हा एक प्रसिद्ध आणि कमी कालावधीचा ट्रेक आहे. येथून धौलाधार पर्वतरांगा आणि कांग्रा व्हॅलीचे विहंगम दृश्य दिसते.
दाल सरोवर हे देवदार वृक्षांनी वेढलेले हे छोटे पण शांत सरोवर आहे. शांतपणे फेरफटका मारण्यासाठी किंवा पिकनिकसाठी हे आदर्श ठिकाण आहे.
कांग्रा किल्ला हा भारतातील सर्वात जुन्या किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे. उत्कृष्ट वास्तुकला आणि व्हॅलीचे अद्भुत दृश्य या किल्ल्यातून दिसते.
धर्मशाळा स्टेडियम हे जगातील सर्वात उंच क्रिकेट स्टेडियमपैकी एक आहे. येथे अनेक आंतरराष्ट्रीय सामने झाले असून, स्टेडियममधून धौलाधार पर्वताचे अप्रतिम दृश्य दिसते.
तिबेटी पारंपरिक कलेला प्रोत्साहन देणारे नॉरबुलिंगका हे सुंदर सांस्कृतिक केंद्र आहे. या संस्थेच्या परिसरात बागा शांततेची अनुभूती देतात.
जंगलाच्या मध्यभागी असलेले सेंट जॉन इन द विल्डरनेस चर्च प्रसिद्ध आहे.
येथील कांग्रा परिसरातील हिरवीगार चहाचे मळेही पाहून ताज्या चहाची चव घेता येते.