पुढारी वृत्तसेवा
दिवाळीची धामधूम सुरू झाली आहे. धनत्रयोदशीची खरेदी करताना वास्तुशास्त्राचे नियम नक्की लक्षात ठेवा.
धनत्रयोदशी दिवशी लोक सोने-चांदी किंवा भांडी खरेदी करतात.
धनत्रयोदशीला कोणत्या गोष्टी खरेदी करणे टाळावे, हे जाणून घेणे ठरते फायदेशीर.
धनत्रयोदशीला लोखंडाऐवजी पितळ, तांबे किंवा चांदीच्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते.
वास्तूनुसार काच अस्थिरतेशी जोडली जाते, त्यामुळे धनत्रयोदशीला क्रॉकरी किंवा शोपीस खरेदी करणे टाळावे.
सुरी, कात्री किंवा सुई अजिबात आणू नका! वास्तुशास्त्रानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी अशा धारदार वस्तू खरेदी करणे वर्जित मानले गेले आहे.
काळ्या रंगाच्या वस्तू खरेदी करणे टाळा: धार्मिक कार्यांमध्ये काळा रंग वर्जित मानला जातो.
धनत्रयोदशीला प्लास्टिकच्या वस्तू खरेदी केल्याने घरातील बरकत समृद्धी कमी होते, असे मानले जाते.
टीप: वरील इंटरनेटवरील माहितीवर आधारित असून, ती केवळ मार्गदर्शन म्हणून विचारात घ्यावी. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.