पुढारी वृत्तसेवा
हा जगातील सर्वात विषारी खेकडा आहे. Toxic Reef Crab किंवा Devil Crab असेही म्हणतात याच्या शरिरात अतिशय जहाल विष साठलेले असते.
याचे शास्त्रिय नाव Zosimus aeneus असे असून हा समुद्रात सापडतो. हिंदी महासागर, प्रशांत महासागरात जपान, फिलीपिन्स, इंडोनेशिया इ देशाच्या किनारी भागात हा आढळतो
हा खेकडा अत्यंत प्रबळ न्यूरोटॉक्सिन्स साठवतो: यामध्ये Saxitoxin व Tetrodotoxin या घातक विषांचा समावेश असतो.
हे विष कोणत्याही उष्णतेने नष्ट होत नाही त्यामुळे या खेकड्याला कितीही शिजवल्यावरही त्याचा धोका कायम राहतो.
नकळत कोणी हा खाल्ला तर त्यास व्यक्तिच्या श्वसन क्रियेवरच परिणाम होतो व ती बंद पडते. अनेक देशात अशा घटना घडल्या आहेत.
ओठ, जीभ बधिर होणे, श्वास घ्यायला त्रास, स्नायू लकवाग्रस्त होणे ही याच्या शरिराची लक्षणे आहेत
हा दिसायला रंगीबेरंगी सुंदर असतो पिवळसर-हिरवट कवचावर लाल/तपकिरी ठिपके असतात पण अत्यंत घातक
हा विष तयार करत नाही पण हा विषारी शेवाळ, जीव खातो ते याच्या मांसामध्ये,यकृतामध्ये साठून राहते.