पुढारी वृत्तसेवा
सध्या उन्हाळा सुरु झाला आहे. बाहेर उन्हात फिरताना शरीराला घाम खुप येतो, यामुळे या दिवसात डीओ वापरणे योग्य ठरते की परफ्युम याबाबत गोंधळ उडतो
Dedorant (डिओडोरंट) आणि Perfume (परफ्यूम) या दोघांचे कार्य वेगळे असते. येथे दोघांमधील मुख्य फरक आणि उन्हाळ्यासाठी काय चांगले आहे हे पाहूया
Deodorant हा घामासाठी सर्वोत्तम असतो. उन्हाळ्यात आपल्याला खूप घाम येतो आणि त्यातून दुर्गंधी येण्याची शक्यता असते.
डिओडोरंट शरीराच्या दुर्गंधीला कारणीभूत असणाऱ्या बॅक्टेरियांना रोखण्याचे काम करते. हे थेट त्वचेवर (प्रामुख्याने बगलेमध्ये) आपण स्प्रे करतो.
जर तुम्हाला जास्त घाम येत असेल, तर डिओडोरंट किंवा 'अँटी-पर्स्पिरंट' (Antiperspirant) वापरणे कधीही चांगले, कारण ते घाम नियंत्रित करते.
दुसरे म्हणजे Perfume किंवा सेंट हा सुगंधासाठी सर्वोत्तम असतो, परफ्यूममध्ये सुगंधी तेलाचे (Essential oils) प्रमाण जास्त असते, त्यामुळे त्याचा सुगंध जास्त काळ टिकतो.
पण पुरफ्यूम हे केवळ चांगला सुगंध देण्यासाठी वापरले जाते, घामाची दुर्गंधी रोखण्यासाठी याचा उपयोग होत नाही आणि हे कपड्यांवर किंवा मनगटावर मारले जाते.
समजा जर तुम्ही फक्त परफ्यूम लावला आणि खूप घाम आला, तर घाम आणि परफ्यूमचा वास मिसळून अधिक विचित्र वास येऊ शकतो.
त्यामुळे उन्हाळ्यामध्ये रोजच्या वापरासाठी डिओ वापरणे योग्य ठरते, हे घामाची दुर्गंधी रोखण्यासाठी जास्त प्रभावी आहे.
तर काही खास कार्यक्रमांसाठी डिओ वापरुन त्याच्यावर हलका परफ्यूम वापरणे योग्य ठरते
तर उन्हाळ्यात उन्हाळ्यात हेवी सुगंधापेक्षा Citrus , Aqua, Floral (फुलांचा) असे सौम्य आणि फ्रेश सुगंधाचे डिओ निवडा तसेच त्वचा कोरडी करुनच डिवो स्प्रे करा.