Dental Enamel Erosion: या ५ चुकांमुळे सळसळतात दात

Anirudha Sankpal

वाढती समस्या

संशोधनानुसार, भारतातील २७% रुग्णांमध्ये दातांचे बाह्य कवच (इनेमल) कमकुवत झाल्याचे दिसून येत असून ही संख्या झपाट्याने वाढत आहे.

चुकीची ब्रश करण्याची पद्धत

जास्त जोरात किंवा कडक ब्रिसल्सने ब्रश केल्यामुळे इनेमल घासले जाते, परिणामी दातांची संवेदनशीलता (Sensitivity) वाढते.

आहाराचा परिणाम

कोल्ड ड्रिंक्स, चहा, कॉफी आणि गोड पदार्थांमुळे दात वारंवार ॲसिडच्या संपर्कात येतात, ज्यामुळे इनेमलचा थर पातळ होतो.

पाण्याचे महत्त्व

शरीरात पाण्याची कमतरता असल्यास लाळ कमी तयार होते; लाळ ही नैसर्गिकरित्या तोंडातील ॲसिड न्यूट्रल करून दातांचे रक्षण करत असते.

घरगुती प्रयोगांचे धोके

लिंबू, बेकिंग सोडा किंवा चारकोल यांसारख्या 'DIY' प्रयोगांमुळे दात पांढरे दिसले तरी इनेमलचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते.

चुकीची टूथपेस्ट

केवळ ताजेपणा किंवा व्हाईटनिंग देणाऱ्या टूथपेस्टवर अवलंबून न राहता 'इनेमल प्रोटेक्शन' असणाऱ्या पेस्टला प्राधान्य द्यावे.

लक्षणांकडे दुर्लक्ष

दात कडांना तुटणे किंवा थंड-गरम लागणे ही इनेमल कमकुवत होण्याची सुरुवातीची लक्षणे असून त्याकडे दुर्लक्ष करू नका.

तज्ज्ञांचा सल्ला

साखरयुक्त किंवा आंबट पेये घेतल्यानंतर पाण्याने चूळ भरणे किंवा स्ट्रॉचा वापर करणे दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

दक्षता

वाढत्या वयापेक्षा आपल्या रोजच्या छोट्या चुकाच दातांच्या आरोग्यासाठी अधिक घातक ठरत आहेत, त्या वेळीच सुधारणे गरजेचे आहे.

येथे क्लिक करा