मोनिका क्षीरसागर
बीट किसून कणकेत मिक्स करा, थोडे मसाले, मीठ, आणि हिरव्या मिरच्या घालून पराठा बनवा. दही किंवा लोणच्याबरोबर मस्त लागतो.
उकडलेलं बीट, बटाटा, ब्रेडक्रम्ब्स आणि मसाले मिसळून कुरकुरीत टिक्क्या तळा किंवा एअर फ्राय करा.
गाजर हलव्याप्रमाणेच बीट किसून, दूध, साखर, साजूक तूप आणि वेलदोडा घालून चविष्ट हलवा बनवा.
भाजणीच्या पिठात किसलेलं बीट, कांदा, कोथिंबीर, आणि हळद-तिखट घालून थालीपीठ तवा वर भाजा.
उकडलेलं बीट किसून दहीत मिसळा. थोडं मीठ, जिरेपूड, आणि साखर घाला – थंडगार आणि पौष्टिक रायता.
बीट आणि आले एकत्र उकळून त्याचा हर्बल चहा बनवता येतो, जो शरीराला डिटॉक्स करतो.
उकडलेलं बीट, चणा, लसूण, लिंबाचा रस, ऑलिव्ह ऑइल यांचं ब्लेंड करून डिप तयार करा. ब्रेड किंवा चिप्ससोबत मस्त लागतं.