पुढारी वृत्तसेवा
निसर्गाने हरणांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी एक खास 'सुरक्षा कवच' दिले आहे ती म्हणजे त्यांची वेगळी नजर. यामुळे ते शिकारी प्राण्यांना दुरूनच ओळखू शकतात.
हरणांचे डोळे डोक्याच्या दोन बाजूला असतात. यामुळे ते एकाच जागी उभे राहून आपल्या सभोवतालचा ३०० अंशांचा (जवळपास पूर्ण गोल) परिसर पाहू शकतात.
या खास डोळ्यांमुळेच, शिकारी प्राणी कोणत्याही दिशेने आला तरी हरणांना त्याची चाहूल लगेच लागते.
हरणांची नजर 'हालचाली' टिपण्यात खूप पक्के असते. शिकारी प्राणी कितीही लपून बसला, तरी त्याची थोडीशी हालचाल हरणांना लगेच सावध करते.
मात्र माणसांच्या तुलनेत हरणांना गोष्टी तितक्या स्पष्ट दिसत नाहीत. त्यांना बारीक तपशील किंवा बारकावे पाहण्यात थोडी अडचण येते.
हरणांना निळा आणि पिवळा रंग स्पष्ट दिसतो; पण लाल आणि केशरी रंग त्यांना काळपट किंवा फिके दिसतात.
हरणांचे डोळे माणसांसारखे वारंवार 'फोकस' बदलत नाहीत. त्यांना जवळच्या आणि दूरच्या गोष्टी एकाचवेळी थोड्या अस्पष्ट दिसतात, पण त्या सर्व एकाच वेळेस त्यांच्या नजरेत असतात.
हरणे अल्ट्राव्हायोलेट प्रकाश पाहू शकतात. त्यामुळे धुतलेले चमकदार कपडे त्यांना जंगलात चमकताना दिसतात आणि ते लगेच पळून जातात.