स्वालिया न. शिकलगार
आज ५ जानेवारी रोजी दीपिका पादुकोण आपला वाढदिवस साजरा करत आहे
दीपिकाचा जन्म डेन्मार्कमध्ये झाला असला तरी तिचे बालपण बंगळुरूमध्ये गेले
तिचे वडील प्रकाश पादुकोण हे बॅडमिंटन खेळाडू. त्यामुळे दीपिकाही नॅशनल बॅडमिंटनपटू बनली
पण पुढे तिने मॉडेलिंग केले, रॅम्प वॉक, जाहिराती आणि फॅशन जगतात तिने पाऊल ठेवले
२००५ साली किंगफिशर कॅलेंडरची मॉडेल म्हणून ती प्रकाशझोतात आली आणि तिच्या करिअरला नवे वळण मिळाले
ती किंगफिशर फॅशन ॲवॉर्ड्समध्ये 'मॉडल ऑफ द ईयर' बनली
२००७ मध्ये ‘ओम शांती ओम’ मधून दीपिकाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले अन् रातोरात स्टार झाली
‘लव्ह आज कल’, ‘कॉकटेल’, ‘ये जवानी है दीवानी’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’ असे अनेक चित्रपट तिने केले
'हाउसफुल', 'रेस २', 'चेन्नई एक्सप्रेस', 'पीकू' असेही चित्रपट दिले
२०१७ मध्ये तिने विन डीजल च्या 'XXX: रिटर्न ऑफ जेंडर केज' मधून हॉलीवूड डेब्यू केलं होतं
तिने कन्नड चित्रपट ऐश्वर्यामधूनही (२००६) साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते