Anirudha Sankpal
तज्ज्ञांच्या मते, तोंडलीमध्ये भरपूर फायबर आणि पोषक तत्वे असतात, जी मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत करतात.
तोंडलीमध्ये विटामिन 'ए' आणि 'सी' मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते.
ही भाजी 'नाईट ब्लाइंडनेस'सारख्या समस्या दूर करण्यास मदत करते आणि वाढत्या वयानुसार डोळ्यांची दृष्टी शाबूत ठेवते.
तोंडली खाल्ल्याने बुद्धी कमी होते किंवा डोळ्यांची दृष्टी कमी होते, हे सर्व दावे पूर्णपणे चुकीचे आणि भ्रामक आहेत.
तोंडली ही डायबिटीज नियंत्रित करण्यासाठी विशेष उपयुक्त असून, ती रक्तातील साखर योग्य पातळीवर ठेवण्यास मदत करते.
फायबरयुक्त असल्याने हे पचनसंस्था सुधारते आणि अँटीऑक्सिडंट्समुळे रोगप्रतिकारशक्ती (इम्युनिटी) वाढवण्यास मदत करते.
तोंडली कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही सहायक ठरते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते.
आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, आठवड्यातून १-२ वेळा तोंडलीचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी खूप हितकारक असते.