Animals Kill Humans: वाघ, बिबट्या नाही तर हा 'अर्धा सेंटिमिटर'चा प्राणी मारतो सर्वाधिक माणसं

Anirudha Sankpal

पानघोड्याची शक्ती

पानघोड्याचे जबडे इतके शक्तिशाली असतात की ते एका मगरीचे देखील दोन तुकडे करू शकतात.

आफ्रिकेतील सर्वात घातक प्राणी

पानघोडा (Hippo) हा आफ्रिकेतील सर्वात घातक मोठा भूचर प्राणी असून त्यांच्या हल्ल्यात दरवर्षी ५०० हून अधिक लोक मारले जातात.

मगरीचा हल्ला

मगरी दरवर्षी साधारण १,००० हून अधिक माणसांची शिकार करतात; त्या भक्ष्याला पाण्याखाली ओढून 'डेथ रोल' तंत्राने ठार मारतात.

गोड्या पाण्यातील गोगलगायी

ऐकायला नवल वाटेल पण गोड्या पाण्यातील गोगलगायींमार्फत पसरणाऱ्या 'शिस्टोसोमियासिस' या परजीवी आजारामुळे वर्षाला २०,००० हून अधिक लोक दगावतात.

रेबीजचा विळखा

कुत्र्यांच्या चाव्यामुळे दरवर्षी सुमारे २५,००० लोकांचा मृत्यू होतो, यातील ९९% मृत्यू हे भटक्या आणि लसीकरण न केलेल्या कुत्र्यांच्या 'रेबीज' संसर्गामुळे होतात.

विषारी सापांचा धोका

सापांच्या दंशामुळे दरवर्षी १ लाखांहून अधिक लोक जीव गमावतात, ज्यात 'सॉ-स्केल्ड वायपर' आणि 'ब्लॅक मांबा' यांसारख्या प्रजाती सर्वाधिक धोकादायक आहेत.

मानव दुसर्‍या क्रमांकावर

डासांनंतर मानव हा स्वतःसाठीच दुसरा सर्वात घातक प्राणी आहे; युद्धे वगळता जगभरात दरवर्षी सुमारे ४ लाख हत्या केल्या जातात.

जगातील सर्वात घातक जीव

डास हा पृथ्वीवरील सर्वात प्राणघातक जीव आहे; मलेरिया आणि डेंग्यूसारख्या आजारांमुळे डासांमार्फत दरवर्षी १० लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो.

येथे क्लिक करा