Dark Chocolate : महिलांनी डार्क चॉकलेट का खावे? जाणून घ्‍या फायदे!

पुढारी वृत्तसेवा

महिलांच्या आरोग्यासाठी डार्क चॉकलेट कसे फायदेशीर ठरू शकते, ते जाणून घेऊया.

उच्च दर्जाचे डार्क चॉकलेट हे पोषक तत्वांनी समृद्ध असते. हे महिलांचे शारीरिक, संप्रेरक (Hormonal) आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करते.

७०% किंवा त्याहून अधिक कोको असलेले अवघे एक औंस डार्क चॉकलेट महिलांच्या आरोग्यासाठी आवश्यक खनिजे आणि वनस्पती संयुगे प्रदान करते.

Jennifer Davick

कॉपर आणि मॅग्नेशियमने भरपूर असलेले डार्क चॉकलेट गर्भाशयाच्या स्नायूंना आराम देते, ज्यामुळे मासिक पाळीत होणार्‍या वेदना कमी होण्‍यास मदत होते.

मासिक पाळीत महिलांच्या शरीरातील लोह (Iron) कमी होते, ज्यामुळे थकवा जाणवतो. एक औंस डार्क चॉकलेटमधून साधारण २ मिलीग्राम लोह मिळते.

डार्क चॉकलेटमध्‍ये असणारे मॅग्नेशियम मज्जासंस्थेला आराम देते. ज्यामुळे मासिक पाळीपूर्वी येणारी चिंता (Anxiety), चिडचिड आणि निद्रानाशाचा त्रास कमी होतो.

संशोधनानुसार, सलग दोन आठवडे रोज डार्क चॉकलेट खाल्ल्याने महिलांमधील कोर्टिसॉल (स्ट्रेस हार्मोन) पातळी कमी होते आणि मानसिक ताण लक्षणीयरीत्या घटतो.

डार्क चॉकलेट मेंदूमध्ये एंडोर्फिन, सेरोटोनिन आणि डोपामाइन हे 'हॅपी हार्मोन्स' रिलीज करते, ज्यामुळे मानसिक आनंद मिळतो आणि मूड लगेच सुधारतो.

डार्क चॉकलेटमध्‍ये असणारे अँटिऑक्सिडंट्स (पॉलिफेनॉल) त्वचेचा रक्तप्रवाह सुधारतात आणि त्वचा हायड्रेट ठेवतात. आणि अकाली वृद्धत्व रोखले जाते.

डार्क चॉकलेट खा, पण दातांची काळजी घ्या; ब्रश करायला विसरू नका!

येथे क्‍लिक करा.