पुढारी वृत्तसेवा
घरात रोज धुप-कापूर लावताय?
घरात सुख-शांती आणि सकारात्मकतेसाठी आपण रोज धुप किंवा कापूर जाळतो, पण त्याचे नियम तुम्हाला माहित आहेत का?
नकारात्मकता होईल दूर
शास्त्रांनुसार, कापूर जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि मन प्रसन्न राहते.
वास्तुदोषावर प्रभावी उपाय
जर घरात सतत कटकटी होत असतील, तर रोज संध्याकाळी धुप दाखवल्याने वास्तुदोष कमी होण्यास मदत होते.
आरोग्यासाठीही फायदेशीर
कापराचा सुगंध हवेतील जंतू नष्ट करतो, ज्यामुळे श्वसनाचे विकार असलेल्यांना काही प्रमाणात आराम मिळू शकतो.
पण सावधान! भेसळ तर नाही ना?
बाजारात मिळणाऱ्या स्वस्त धुप-कापरामध्ये घातक रसायने असू शकतात, जी फुफ्फुसांसाठी हानिकारक ठरतात.
नेहमी नैसर्गिक उत्पादने वापरा
धूप लावताना तो नैसर्गिक घटकांपासून (उदा. गाईचे शेण किंवा औषधी वनस्पती) बनलेला असेल याची खात्री करा.
खिडक्या उघड्या ठेवा
धुप किंवा कापूर लावल्यानंतर घराच्या खिडक्या काही वेळ उघड्या ठेवा, जेणेकरून धूर साचून गुदमरल्यासारखे होणार नाही.
दिवसातून कधी लावावा?
संध्याकाळच्या वेळी म्हणजेच 'तिन्हीसांजेला' धुप-कापूर लावणे सर्वात शुभ मानले जाते.