'कुछ मीठा हो जाए...’ जेवल्यानंतर गोड का खावंसं वाटतं? जाणून घ्या कारणे

पुढारी वृत्तसेवा

जेवण पूर्ण झाल्याची भावना

अनेकांना जेवणानंतर गोड खाल्ल्याशिवाय आपले जेवण पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही, ही एक मानसिक सवय असू शकते.

ऊर्जेची गरज

जेवण पचवण्यासाठी शरीराला ऊर्जेची गरज असते, आणि साखर (Glucose) शरीराला त्वरित ऊर्जा देण्याचे काम करते.

Sugar Craving Causes

सेरोटोनिनचा प्रभाव

गोड पदार्थ खाल्ल्यामुळे मेंदूमध्ये 'सेरोटोनिन' नावाचे 'हॅप्पी हार्मोन' रिलीज होते, ज्यामुळे आपल्याला समाधानी आणि आनंदी वाटते.

पचन प्रक्रियेत मदत

मर्यादित प्रमाणात गुळ किंवा गोड पदार्थ खाल्ल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते, असे मानले जाते.

canva photo

रक्तातील साखरेची पातळी

कार्बोहायड्रेट्सयुक्त जेवणानंतर रक्तातील इन्सुलिन वाढते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी थोडी कमी होऊन गोड खाण्याची तीव्र इच्छा (Sugar Cravings) होते.

Pexel Image

चवीचा समतोल

तिखट किंवा मसालेदार जेवणानंतर जिभेवरील चव संतुलित करण्यासाठी आणि जळजळ कमी करण्यासाठी मन आपोआप गोडवा शोधते.

अपुरी झोप किंवा ताण

जर तुमची झोप पूर्ण झाली नसेल किंवा तुम्ही तणावात असाल, तर शरीर उर्जेसाठी साखरेची मागणी करते.

Sleep Drooling

सावधानता बाळगा

जेवणानंतर गोड खाणे आनंददायी असले तरी, अतिप्रमाणात साखर खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते, त्यामुळे प्रमाण मोजकेच ठेवा

येथे क्लिक करा...