Toddlers Swallowing: सावधान! मुलानं 'Button Battery' तर गिळली नाही ना... ठरू शकतं जीवघेणं

Anirudha Sankpal

धोक्याची घंटा

लहान मुलांनी खेळताना बटन बॅटरी गिळणे ही एक 'डाय हार्ड इमर्जन्सी' असून, यात तातडीने उपचार मिळणे अत्यंत आवश्यक असते.

पालकांची सतर्कता

अडीच वर्षाच्या मुलाने चपटी, सिल्व्हर रंगाची वस्तू गिळल्याचे लक्षात येताच पालकांनी रात्री उशिरा डॉक्टरांशी संपर्क साधून सतर्कता दाखवली.

शक्यतेचा अंदाज

अशा परिस्थितीत गिळलेली वस्तू साधा 'कॉइन' आहे की घातक 'बटन बॅटरी', हे ओळखणे उपचारांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे असते.

बॅटरीमधील धोका

बटन बॅटरीमध्ये लिथियम असते, जे अन्ननलिकेत किंवा जठरात गेल्यावर रासायनिक प्रक्रिया करून 'अल्कलाईन इंजुरी' निर्माण करते.

गंभीर इजा

या रासायनिक प्रक्रियेमुळे (Liquefactive Necrosis) अवघ्या काही तासांत अन्ननलिकेला किंवा जठराला छिद्र पडण्याची भीती असते.

भयानक गुंतागुंत

अंतर्गत रक्तस्त्राव (Bleeding), व्होकल कॉर्ड पॅरालिसिस किंवा फिश्टुला यांसारखी गुंतागुंत झाल्यास ती हाताळणे खूप कठीण होऊन बसते.

निदान प्रक्रिया

केवळ एका एक्सरेवर अवलंबून न राहता, रिपीट एक्सरे करून ती वस्तू बटन बॅटरीच असल्याची खात्री डॉक्टरांनी पटवून दिली.

तात्काळ उपचार

बाळाला तातडीने भूल देऊन 'एंडोस्कोपी'च्या साहाय्याने ती घातक बॅटरी बाहेर काढण्यात आली आणि संभाव्य धोका टळला.

सावधपणा

डॉक्टरांनी दिलेल्या सूचनेवर विश्वास ठेवून पालकांनी तातडीने निर्णय घेतल्यामुळेच बाळाचा जीव वाचवणे सुलभ झाले.

येथे क्लिक करा