Garud Puran: गरुड पुराण: परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहणाऱ्यांना नरकात कोणती शिक्षा मिळते?

पुढारी वृत्तसेवा

प्रत्येक व्यक्तीला आपल्या कर्मांची फळे भोगावीच लागतात, असे भारतीय धर्मग्रंथांमध्ये स्पष्ट सांगितले आहे. मृत्यूनंतरही आत्म्याला आपल्या कर्मांचे परिणाम सहन करावे लागतात, असे मानले जाते.

गरुड पुराणात अशाच काही भयानक शिक्षांचे वर्णन केले आहे. परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहणारे किंवा अत्याचार करणाऱ्यांसाठी अत्यंत कठोर शिक्षांचा उल्लेख या ग्रंथात करण्यात आला आहे.

गरुड पुराणानुसार, अनैतिक संबंध ठेवणाऱ्या पापी लोकांना नरकात लोखंडाच्या लालभडक तापलेल्या स्त्रीच्या मूर्तीला मिठी मारण्याची शिक्षा दिली जाते.

ही शिक्षा इतकी वेदनादायक असते की मृत्यूही त्यापुढे क्षुल्लक वाटतो. लाखो वर्षे अशी यातना सहन करावी लागते, असे वर्णन पुराणात आहे.

व्यभिचारात लिप्त असलेल्या पापी व्यक्तींना नरकामध्ये उकळत्या तेलाच्या कढईत टाकले जाते, ज्यामुळे आत्म्याला प्रचंड यातना होतात.

केवळ तेलच नाही, तर अशा व्यक्तींना विषारी साप आणि काटेरी कोळ्यांच्या पिंजऱ्यात सोडून त्यांचा छळ केला जातो.

परस्त्रीवर अत्याचार करणाऱ्यांना अणकुचीदार खिळे आणि टोकदार काट्यांनी भरलेल्या रस्त्यावरून लाखो मैल अनवाणी चालवण्याची शिक्षा दिली जाते.

गरुड पुराण सांगते की, कर्माच्या या चक्रातून कोणाचीही सुटका होत नाही. त्यामुळे मनुष्याने नेहमी सन्मार्गाने आणि सदाचाराने वागावे.

टीप: येथे दिलेली माहिती केवळ पारंपरिक कथांवर आधारित आहे.