Protein Side Effects: सगळे प्रोटीन प्रोटीन करत आहेत... मात्र अतिरेक झाला तर काय?

Anirudha Sankpal

प्रोटीन हे शरीर बांधणी, स्नायूंची मजबुती, हाडांचे आरोग्य आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी एक अत्यंत आवश्यक पोषक तत्व आहे.

प्रत्येक व्यक्तीची प्रोटीनची गरज वेगळी असते; सामान्यतः महिलांना त्यांच्या वजनाच्या प्रति किलो १.७५ ते १.८० ग्रॅम प्रोटीनची आवश्यकता असते.

स्तनपान करणाऱ्या माता, रजोनिवृत्ती (Menopause) जवळ आलेल्या महिला किंवा खेळाडूंना शरीराच्या रिकव्हरीसाठी २ ग्रॅम प्रति किलोपर्यंत प्रोटीनची गरज भासू शकते.

आहारात प्रोटीनची कमतरता असल्यास थकवा जाणवणे, एकाग्रता कमी होणे, मूड बदलणे आणि वजन वाढणे अशा समस्या उद्भवू शकतात.

प्रोटीनचे अतिसेवन केल्यास पचनक्रिया मंदावते, ज्यामुळे पोट फुगणे, गॅस होणे आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.

प्रमाणापेक्षा जास्त प्रोटीन घेतल्यास डीहायड्रेशन, डोकेदुखी, तोंडाला दुर्गंधी येणे आणि दीर्घकाळात किडनी स्टोनचा धोका वाढतो.

प्रोटीनची मात्रा जास्त झाल्यास हृदयविकाराचा धोकाही संभवतो, त्यामुळे दिवसभरात २ ग्रॅम प्रति किलोपेक्षा जास्त प्रोटीन घेणे टाळावे असा सल्ला तज्ज्ञ देतात.

जर तुम्हाला प्रोटीनच्या अतिसेवनामुळे त्रास जाणवत असेल, तर आहारात फायबर, निरोगी फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण वाढवणे फायदेशीर ठरते.

स्वतःहून कोणताही मोठा बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊनच प्रोटीनची योग्य मात्रा निश्चित करावी.

येथे क्लिक करा