Black Garlic | दररोज काळा लसूण खाल्ल्यास रक्तदाब, हृदयविकाराचा धोका होईल कमी

पुढारी वृत्तसेवा

स्वयंपाक घरातील विविध प्रकारचे मसाले जेवणाचा स्वाद वाढवतात, त्याचबरोबर शरीरासाठी देखील फायदेशीर ठरतात

ब्लॅक गार्लिक (काळा लसूण) नियंत्रित उष्णता आणि आर्द्रतेत हळूहळू भाजला जातो. या प्रक्रियेमुळे लसणाची पोषणतत्त्वे वाढतात

ब्लॅक गार्लिकमध्ये सामान्य लसूणपेक्षा जास्त अँटीऑक्सिडन्ट्स असतात, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून फ्री रॅडिकल्सच्या हल्ल्यापासून संरक्षण करतात

काळ्या लसणामध्ये अलिसिनचे प्रमाण कमी असल्याने पचनास सोपे होते आणि पोटाचे कार्य सुरळीत राहते

काळ्या लसणाचे नियमित सेवन केल्यास रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो

काळ्या लसणातील इम्यून- बुस्टिंग घटक शरीराचे संसर्ग आणि व्हायरल आजारांपासून संरक्षण करतात

ब्लॅक गार्लिक वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि धमन्या निरोगी ठेवण्यास मदत करतो

ब्लॅक गार्लिक सॅलड, सूपसोबत किंवा साईड डिश म्हणून खाता येतो. सौम्य, गोड चवीमुळे नाश्त्याप्रमाणे खाता येतो

ब्लॅक गार्लिकचा दररोज आपल्या आहारात वापर केल्याने शरीराला अनेक फायदे मिळू शकतात

येथे क्लिक करा